प्रतिनिधी / वैराग
एकीकडे आरोग्य प्रशासन पोलीस प्रशासन सर्व संघटना ह्या कोरोना सारख्या भीषण महामारीच्या काळात कोरोनाशी एकहाती झुंज देत आहेत स्वछता,सार्वजनिक अंतर,व प्रतिबंधात्मक नियमंचा काटेकोर पणे सर्व नागरिक पालन करत आहेत आणि दुसरीकडे कोविड सेंटर असणाऱ्या साई कॉलेज वैराग मधील अस्वच्छता कोरोनाला प्रतिबंध करतोय का कोरोना ला आमंत्रित करतोय हा प्रश्न पडतोय?
अस्वच्छता करणारे हे कोविड सेंटर रुग्णाच्या आरोग्याशी खेळतोय वैराग सासुरे नागरिक म्हणून सर्वांनी या कडे लक्ष देणे गरजेचे आहे.
कारण आपला आयुष्यातील प्रत्येक क्षण हा कोरोना लढ्यासाठी खर्ची जातोय आपल्याला प्रत्येक लहान गोष्ट ही प्रतिबंधात्मक नजरेनेच पाहायच आहे. त्यामुळे ह्या गोष्टीकडे दुर्लक्ष म्हणजे आपल्या आरोग्याशी केलेला हा दगा असेल. या ठिकाणी असलेली अस्वच्छता ही काढून स्वच्छ परिसर करून त्या ठिकाणी निर्जंतुक करण्यासाठी प्रशासनाने प्रयत्न करावा. अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केली आहे.
अन्यथा आंदोलन करण्यात येईल असे स्पष्ट केलं आहे.या वेळी बापूसाहेब घोडके, बाबा शेख, प्रदीप गायकवाड,प,सुरज सातपुते,अविनाश मोरे,प्रफुल भोसले,आशिष बोकडेउपस्थित होते.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









