प्रतिनिधी / वैराग
कोरोना संसर्गाच्या महामार्गामुळे अनेकांचे रोजगार गेलेत, हाताला काम नाही, महागाईने कळस गाटलेला असताना वैराग मध्ये लॉकडाऊन च्या काळात जीवनावश्यक असणाऱ्या काही किराणा दुकानात मात्र चढ्या भावाने मालाची विक्री होत असल्याने ग्राहकांची लूट होत सामान्य जनतेला याचा फटका बसतो आहे.
राज्य शासन व जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार लॉकडाऊन काळात सकाळी ७ ते रात्री ८ या वेळेत जीवनावश्यक दुकाने, भाजीपाला व कृषी वस्तूंची दुकाने सुरू आहेत. वैराग हे सुमारे सत्तावन खेड्यांचे दैनंदिन दळणवळणाचे व व्यापारी व्यापारी गाव असल्याने या ठिकाणी दररोज किराणा बाजाराची मोठी उलाढाल होत असते. याचबरोबर सध्या लॉकडाऊन असल्यामुळे बाहेरगावचे लोक व गावातील लोक पुरेसा किराणामाल भरून ठेवत असताना दिसून येत आहे.
परंतु भैरव मधील काही किराणा दुकानदार हे आपल्याकडील किराणामाल जास्त भावाने विकत असल्याच्या तक्रारी ग्राहकांमधून येत आहेत. एकीकडे लॉकडाऊनमध्ये व्यापारी आपले उखळ पांढरे करून घेत असलेले दिसून येत असून सर्वसामान्यांना मात्र या जबर फटका बसतो आहे. अशाकडे प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे.