प्रतिनिधी/वैराग
येथे घराच्या दरवाजाचे कडीकोयंडा तोडून घरफोडी करत घराच्या ठेवलेले ५६ हजार रोख व कागदपत्राची चोरी अज्ञात चोरट्यांनी केली असून याबाबत वैराग पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. ही घरफोडीची घटना शुक्रवारी संध्याकाळी अकरा ते शनिवारी पहाटे पाच वाजण्याच्या दरम्यान वैराग माढा रोडलगत धायगुडे प्लॉट येथे घडली.
याबाबत वैराग पोलिसांनी दिलेली माहिती अशी की फिर्यादी रमेश मोतीराम गायकवाड ( रा. वैराग. धायगुडे प्लॉट ) यांच्या घराचे अज्ञात चोरट्यांनी कडीकोयंडा तोडून घरात प्रवेश करत, घरातील धान्य कोठीत ठेवलेली ५५ हजार रुपये व पॉकेट मध्ये ठेवलेले एक हजार पाचशे रुपये रोख असे एकूण ५६ हजार पाचशे रुपये, व कागदपत्रे अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले. अशी फिर्याद रमेश गायकवाड यांनी वैराग पोलिसात दिली असून यावरुन अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. वैराग हद्दीत अलीकडे घरफोडी, दुकान फोडी व दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली असून अज्ञात चोरट्यां विरोधात फक्त गुन्हे दाखल झालेले आहेत .









