वेळापूर / वार्ताहर
येथील नाईक हॉस्पिटल समोर पूर्ववैमनस्यातून विपुल पोरे याने दोघांवर गोळीबार केला. सुदैवाने तरुणांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला गेला.
अधिक माहिती अशी की, पावणे सहाच्या दरम्यान नाईक हॉस्पिटल समोर वेळापूर येथील तरुण विपुल नामदेव पोरे याने गेल्या दोन वर्षापूर्वी घडलेल्या भांडणातून निमगावमगर येथील दोन तरुणावर गावठी कट्टाने दोघांवर प्राणघातक गोळीबार केला. सुदैवाने समोरच्या दोघांनी खाली वाकल्या मुळे पुढील अनर्थ टळला.
यामध्ये कृष्णराव सुभाष चव्हाण व लालासो महादेव मगर हे दोघेजण प्रसंगावधान ओळखून वाचले. गोळीबार करून आरोपी विपुल नामदेव पोरे हा फरार झाला आहे. त्याचेवर प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. आरोपी हा गुन्हेगार प्रवृत्तीचा आहे . त्याच्यावर यापूर्वी अनेक गुन्हे आहेत .
वेळापूर मध्ये गोळीबार झाल्याने एकच खळबळ उडाली आहे वेळापूर पोलीस स्टेशनच्या आवारात एकच गर्दी उडाली आहे याबाबत उशिरापर्यंत फिर्याद देण्याचे काम सुरू होते
Previous Articleसव्वा वर्षानंतरही ऍस्ट्रोटर्फ मैदानाची निर्मिती अंधातरीतच
Next Article पाश्चात्यीकरण म्हणजे आधुनिकीकरण नव्हे









