सोलापूर / प्रतिनिधी
लॉकडॉऊनमुळे प्रवासी वाहतूक, फेरीवाले बांधकाम, सुतार-लोहार लॉन्ड्री ,व्यवसाय नाभिक चर्मकार यांचे व्यवसाय बंद पडले तरी शासनाकडून त्यांना मदत मिळत नसल्याच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीच्या वतीने नगरसेवक आनंद चंदनशिवे यांच्या नेतृत्वाखाली आज बुधवारी सोलापुरातील एसटी स्टँडसमोर डफली बजाओ आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलकर्त्यानी विविध मागण्याचे पोस्टर हातात घेतले होते, डोक्यावर गांधी टोपी घातली होती.
महिला बचत गटांच्या कर्ज पिढीला मुदतवाढ मिळावी त्यांना व्याजमाफी द्यावी, लॉकडाऊनमुळे झालेल्या लघुउद्योजकांना अर्थसहाय्य द्यावे, बांधकाम कामगारांना शासनाकडून आणखी आर्थिक मदत मिळावी, सुतार, लोहार ,चर्मकार नाभिक युवकांनाही शासनाने रोख रकमेच्या स्वरूपात मदत करावी अशा विविध मागण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सोलापूरसह राज्यात आंदोलन सुरू आहे.
यावेळी नगरसेवक गणेश पुजारी, नगरसेविका ज्योती बमगोंडेड, महिला आघाडी राज्य कार्यकारिणी सदस्य अंजना गायकवाड, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा रेश्मा मुल्ला, मंदाकिनी शिंगे, सुजाता वाघमारे, हेमा वाघमारे, पल्लवी सुरवसे, बबन शिंदे ,नाना कदम ,गौतम चंदनशिवे, जावेद पटेल श्रीमंत जाधव यांच्यासह वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.