तरुण भारत संवाद प्रतिनिधी / कुर्डुवाडी
कुर्डुवाडी शहरात विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांवर चाप बसला असून पोलिस प्रशासनाने दंडात्मक कारवाई करुन सुमारे १ लाख २८ हजारांचा दंड वसूल केला.
१ एप्रिल ते १५ एप्रिलच्या दरम्यान आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत शहर व परिसरात विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांवर पोलिसांनी दंडात्मक कारवाईचा बडगा उगारुन विनामास्क फिरणाऱ्या २५६ नागरिकांवर दंडात्मक कारवाई करुन सुमारे १ लाख २८ हजारांचा दंड वसूल केला. ही कारवाई पोलिस उपनिरीक्षक हनुमंत वाघमारे, सागर सुरवसे, पो.ना.घोरपडे, हे. काॅ. घाडगे यांनी केली.