प्रतिनिधी / कुर्डुवाडी
वारसा नोंदीसाठी हजार तर विहिर नोंदीसाठी दीड हजार लाचेची मागणी करणाऱ्या भुताष्टेच्या तलाठ्याची तात्काळ बदली करा. अन्यथा २४ ऑगष्ट रोजी सर्व गावकरी स्मशानभूमीत उपोषणाला बसणार असल्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते सागर यादव यांनी प्रांत अधिकारी ज्योती कदम यांना दिलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे.
यादव यांनी प्रांताधिकारी यांना दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की भुताष्टेचे तलाठी समाधान पाटील हे गावातील नागरिकांना काहीही कारणे देत पैशासाठी वेठीस धरून कामात दिरंगाई करत आहेत. कोरोनाच्या संकटामुळे आधीच शेतकरी वर्ग संकटात असताना नोंदीसाठी गेलेल्या शेतकऱ्यांची अडवणूक करुन वरकमाईसाठी हजारोंची आकडेमोड करणाऱ्या या तलाठ्याच्या कारभाराला नागरिक त्रस्त झाले आहेत.
कामाबाबत विचारणा करणाऱ्या व्यक्तीस अर्वाच्य भाषा वापरत मला वेळ मिळेल त्यावेळेस मी काम करेन” माझी तक्रार कोणाकडे करायची ती करा” अशा उद्दाम भाषेत बोलतात. ते याच सज्जातील रहिवासी असल्यामुळे राजकारण व दमदाटी करत आहेत. स्वार्थासाठी ते दप्तरात फेरबदल करु शकतात. त्यामुळे आठ दिवसाच्या आत त्यांची बदली करा अन्यथा सर्व गावकरी राज्य घटनेने दिलेल्या न्याय हक्कासाठी भुताष्टे गावातील स्मशानभूमीत उपोषणाला बसणार आहोत. पुढील परिणामास आपण जबाबदार असाल. आता प्रांताधिकारी कोणता निर्णय घेतात याकडे भुताष्टेतील नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे.
प्रतिक्रिया – मयत वडिलांच्या नावे असलेल्या शेतजमीनीवर वारस म्हणून नाव नोदणीसाठी तलाठी समाधान पाटील यांच्याकडे रितसर अर्ज करूनही वर्षापूर्वी १ हजार लाचेपोटी घेऊनही अद्याप काम करत नसून उद्धटपणे उत्तर देऊन कुठे तक्रार करायची तिथे कर असे उत्तर देत आहे.
पीडीत शेतकरी – दिलीप वाघमारे ( भुताष्टे )
प्रतिक्रिया – राजकीय आकसापोटी हे असे वागत असून अशी कोणाची अडवणूक केली जात नाही.
तलाठी- समाधान पाटील (भुताष्टे)
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









