प्रतिनिधी / करमाळा
उत्तर प्रदेशमधील लखीमपुर येथे आंदोलक शेतकऱ्यांना केंद्रीय मंत्री मिश्रा यांच्या मुलाने चार चाकी गाडीने चिरडल्यामुळे संपूर्ण देशात संतप्त लाट उसळली आहे. या घटनेच्या निषेधार्थ महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारने आज, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बंद पाळला आहे. सोलापुरात ही या बंदला चांगला प्रतिसाद मिळत आहे. करमाळा येथे काँग्रेस आय पक्षातर्फे सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हा सरचिटणीस सुनील बापु सावंत यांच्या नेतृत्वाखाली शहीद शेतकऱ्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
यावेळी करमाळ्यातील शेतकरी, व्यापारी, गाळेधारक तसेच हमाल पंचायतीतील सर्व हमाल एकत्रित आले होते. व त्यांनी या आंदोलनाला पाठिंबा दर्शविला. यावेळेस उपस्थित वक्त्यांनी भाजपच्या हिटलरशाही धोरणाचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला. यावेळेस भारिपचे पदाधिकारी देवा लोंढे यांनी या आंदोलनाला पाठिंबा दर्शविला.
यावेळी गुरसुळीचे माजी सरपंच दत्तात्रय आडसूळ, राष्ट्रवादीचे नेते गोवर्धन चवरे पाटील, मुस्लीम विकास परिषदेचे हाजी फारुख बेग यांची भाषणे झाली. सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हा सरचिटणीस सुनील बापु सावंत यांनी बीजेपीच्या हिटलरशाही धोरणावर हल्ला चढवला. शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे आणि कित्येक महिने झाले शेतकरी हा शांतते मध्ये त्याच्या न्याय हक्कासाठी आंदोलन करत आहे. या आंदोलनाचा धसका घेऊन बीजेपीचे मंत्री पदाधिकारी व नेते या आंदोलनाला कोणत्याही प्रकारे हिंसक मार्गाने चिरडण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याचा काँग्रेस पक्षाच्या वतीने तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला. शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य न केल्यास व शेतकऱ्यांवर वारंवार होणारे हल्ले त्वरित न थांबविल्यास, केंद्रातील मोदी सरकारला येणाऱ्या निवडणुकीमध्ये शेतकऱ्यांची ताकद काय असते, हे शेतकरीवर्ग दाखविल्याशिवाय राहणार नाही, अशा प्रकारचा खरमरीत शब्दांमध्ये सावंत यांनी मोदी सरकारचा निषेध व्यक्त केला.
या आंदोलनात शेतकरी वर्ग, हमाल वर्ग, व्यापारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. या आंदोलनाचे निवेदन करमाळा पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक जगदाळे यांनी स्वीकारले.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









