लऊळ / वार्ताहर
माढा तालुक्यातील लऊळ येथे डिकोळे गल्ली येथील जागृत देवस्थान मरीआई लक्ष्मी मंदिरातील मौल्यवान वस्तुसह देवीची मूर्ती शनिवारी रात्री 2.30 ते 3 च्या सुमारास चोरीला गेली.
सदरच्या मंदिरातील चोरीमध्ये 1 तोळा मरीआई देवीची टाक, 4 तोळा सोन्याचे मरीआई लक्ष्मीचे दागिने पेटीत ठेवलेले व एक दुरडीमध्ये दीड किलो चांदीचा पाळणा तसेच रोख रक्कम 4 हजार रुपये असे एकूण अंदाजे 1 लाख 74 हजार रुपयांची मौल्यवान वस्तूंची चोरी झाली आहे.
हे मरीआई लक्ष्मी मंदिर हे सार्वजनिक असून या मंदिराचे पुजारी राजाराम दिगंबर डिकोळे यांनी कुर्डुवाडी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध फिर्याद दिली आहे. पुढील तपास कुर्डुवाडी पोलीस स्टेशनचे पीआय रवींद्र डोंगरे करत आहेत.
Previous Articleनामदेव अंतरपाट संस्थेतर्फे उद्या ऑननलाईन वधू-वर परिचय मेळावा
Next Article भारतानंतर आता अमेरिकेतही टिक टॉक आणि वी चॅटवर बंदी









