प्रतिनिधी / कुर्डुवाडी
दुचाकीस्वाराला वाचविण्यासाठी भरधाव वेगात असलेल्या कारगाडीचालकाने हँडब्रेकचा वापर केल्यामुळे कारगाडीने तीन चार पलट्या घेतल्या यामध्ये कारगाडीतील दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. प्रशांत रमेश माने (वय २३,रा मळोली ता माळशिरस) व दीपक थोरात ( वय-३०,रा देवडी ता मोहोळ ) अशी गंभीर जखमी झालेल्याची नावे आहेत.ही घटना मंगळवार दि.२ रोजी दुपारच्या सुमारास घडली.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार कुर्डुवाडी – पंढरपूर रस्त्यावर लऊळ गावच्या नजीक पंढरपुरहून कुर्डुवाडीकडे भरधाव वेगात येणाऱ्या कार गाडीसमोरील दुचाकीस्वाराने पेट्रोल भरण्यासाठी अचानक गाडी पंपाच्या दिशेने वळवल्यामुळे दुचाकीस्वाराला वाचविण्याच्या उद्देशाने कारचालकाने कारगाडीच्या हँडब्रेकचा वापर केला. त्यामुळे कारगाडीने तीन चार पलट्या घेतल्या यामध्ये कारगाडीतील दोघेजण गंभीर जखमी झाले असून गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. जखमींना पुढील उपचारासाठी अकलूज येथे हलविण्यात आले आहे.