तरुण भारत संवाद प्रतिनिधी/सोलापूर
कोरोनामुळे देशात 22 मार्च पासून रेल्वेची प्रवासी वाहतूक बंद होती. मात्र केंद्र सरकारने 1 जून पासून 200 प्रवासी गाड्या सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मागील दोन महिन्यांपासून सोलापूर रेल्वे स्टेशन सुनेसुने पडले होते. मात्र सोमवारी सांयकाळी 4 वाजता मुंबई- बेंगलोर उद्यान एक्सप्रेस हे गाडी सोलापूर रेल्वे स्थानकावर आल्यानंतर सोलापूर स्थानकावरून 71 प्रवाशांनी प्रवास केला असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली.
मागील दोन महिन्यापासून कुणामुळे रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या होत्या मात्र सोमवारपासून देशभरात दोनशे विशेष गाड्या चालविल्या जाणार आहेत. त्यापैकी सोलापूर रेल्वे स्थानकावर चार गाड्या थांबणार आहेत. यामध्ये मुंबई बेंगलोर उद्यान एक्सप्रेस मुंबई-गदग एक्सप्रेस, मुंबई-हैदराबाद हुसेनसागर एक्सप्रेस, मुंबई भुवनेश्वर कोणार्क एक्सप्रेसया गाड्यांना थांबा देण्यात आला आहे. त्यामुळे तब्बल 70 दिवसानंतर सोलापूर रेल्वे स्थानक प्रवाशांनी गजबजले आहे. सोलापूर रेल्वे सर्व फ्लॅटफॉर्म, प्रतिक्षालय कक्ष, पादचारी पूल, रेल्वे कार्यालय, प्रवाशाची बैठक व्यवस्था, निर्जुतुकिकरण करण्यात आले.
दोन महिन्यांपासून लॉकडाऊन काळात सर्वच प्रवासी वाहतूक गाड्या बंद करण्यात आल्या होत्या. त्यामुळे देशाच्या विविध ठिकाणी अनेक प्रवासी अडकून पडले होते. या सर्व प्रवाशांना आता तब्बल 70 दिवसांनी त्यांच्या गावी जाता येणार आहे. सोमवारी रेल्वे स्थानकावर दोन गाड्या येणार आहेत. त्यासाठी रेल्वेस्थानकावरील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना एक जूनपासून कामावर येण्यासाठी सूचना देण्यात आलेल्या आहेत. रेल्वे स्थानकावरील आरक्षण खिडक्या सुरू करण्यात आलेल्या आहेत. प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन सर्वच विभागातील स्थानकावर स्थानकावरील स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे.
Trending
- Testing1
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









