पूरग्रस्त भागाची करणार पाहणी
प्रतिनिधी / वैराग
बार्शी तालुक्यातील गावानां जोरदार पावसाचा तडाखा बसला असून पूरपरिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी करून शेतकरी, ग्रामस्था यांना भेटण्यासाठी रूपालीताई चाकणकर १९ रोजी बार्शी तालुक्याचा दौरा करणार आहेत. बार्शी तालुक्यातील वैराग, हिंगणी, पिंपरी, धामणगाव, सासूरे, सौदरे, मुंगशी (वा) या तालुक्यातील पूरग्रस्त गावानां प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर या भेट देऊन नुकसानीची पाहणी करुण शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत.
सकाळी ७ वाजता त्या पुणे येथुन निघणार आहेत. ११ वाजता बार्शी शहर व वैराग येथे आगमन व नैसर्गिक आपत्तीमुळे पडझड झालेल्या घरांची पाहणी व ग्रामस्थांशी चर्चा भोगावती, नागझरी नदीची व पूरग्रस्त भागाची पाहणी करून वैराग शहरात व वैराग भागात भेटी देऊन संवाद साधणार आहेत. आगमन व अतिवृष्टीमुळे पडझड झालेल्या घरांची व शेतीपीकांच्या नुकसानीची पाहणी आपत्तीग्रस्त घरांची व शेतीपीकांच्या नुकसानीची पाहणी, करणार असल्याचे त्यांनी सांगितले व पूरपरिस्थितीबाबत अधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत.