प्रतिनिधी / सोलापूर
हॉकिपटू मेजर ध्यानचंद यांचा 29 ऑगस्ट हा जन्मदिवस राष्ट्रीय क्रिडा दिवस म्हणून साजरा केला जातो. या राष्ट्रीय क्रीडा दिवसानिमित्ताने महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या वतीने क्रिडा मार्गदर्शक, क्रिडा पत्रकारांचा सन्मान महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसतर्फे शनिवारी करण्यात आला.
महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसतर्फे पार्क स्टेडीयम येथे शनिवारी महापालिका क्रिडाधिकारी नजीर शेख, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापिठातील क्रिडा सन्मवयक प्रा. सुरेश पवार यांच्या हस्ते क्रिडा मार्गदर्शक, क्रिडा पत्रकारांचा सन्मान शाल व पुष्पगुच्छ देऊन केला. कार्यक्रमाचे आयोजन महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस प्रशांत बाबर यांनी केले होते.
यावेळी क्रिडा मार्गदर्शक प्रा. किरण चौगुले, प्रा. आनंद चव्हाण, प्रा. शरण वांगी, प्रा. राहुल हजारे, पोलीस कर्मचारी व राष्ट्रीय खेळाडू अतुल गवळी, तसेच क्रिडा पत्रकार अजित संगवे, विरेश अंगडी, नितीन ठाकरे, बसवराज मठपती, रणजित वाघमारे, अमोल सिताफळे आदींचा यावेळी सत्कार करण्यात आला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महेश कुलकर्णी, विशाल झळके, संदिप कुसेकर, ओंकार जगताप, आकाश अंबीपूर आदींपी परिश्रम घेतले.
क्रिडा क्षेत्रात कार्यरत राहण्याची घेतली शपथ
मेजर ध्यानचंद यांना स्मरण करुन भारताचे नाव क्रिडा क्षेत्रात उंचावेल यासाठी आम्ही कार्यरत राहू अशी शपथ यावेळी उपस्थितांनी घेतली.
Previous Articleसांगली : जतमध्ये भांडण सोडविणाऱ्यावर चाकूने वार
Next Article राज्यातील विजेचा, सिंचनाचा प्रश्न सुटला









