मराठा समाजास आरक्षण द्यावे या मागणीसाठी पाठविले पोस्ट कार्ड
तरुण भारत संवाद प्रतिनिधी / सोलापूर
मराठा समाजाला हक्काचे आरक्षण मिळावे यासाठी महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब भाई शेख व कार्याध्यक्ष रविकांत वर्पे, सुरज चव्हाण यांच्या आदेशानुसार आज रेल्वे स्टेशन रोड येथीलद पोस्ट आफीस समोर सोलापूर शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष जुबेर बागवान यांच्या नेतृत्वाखाली 5000 पोस्ट कार्ड प्राथमिक स्वरूपात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठविण्यात आले.
एकुण एक लाख पोस्ट कार्ड हे सोलापूर शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने पाठविण्यात येणार असून सोबत आशिष बसवंती, मुसा अत्तार, संपन्न दिवाकर, रमीज कारभारी, जहीर गोलंदाज, कूणाल वाघमारे, सरफराज बागवान, सोहेब बागवान, शेरू लोकापल्ली, सचीन करणकोट, रोहन उड्डाशिवे,मुजफ्फर बागवान, असलम शेख, उमर दलाल , अब्दुल सलाम बागवान, अल्ताफ पठाण, इशरत नागुरे, विनोद झळके अदी उपस्थित होते









