तरुण भारत संवाद प्रतिनिधी / सोलापूर
राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंती दिनानिमित्त सोलापुरातील युवा चित्रकार विपुल मिरजकर यांनी रांगोळीतून अनोख्या पद्धतीने अभिवादन केले आहे.
छत्रपती शाहूराजे प्रतिष्ठानच्या वतीने मिलींद नंगर बुद्ध विहार सोलापुर येथे राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या 147 व्या जयंतीनिमित्त १ मे १९७९ रोजी केंद्र सरकारच्या डाक विभागाने प्रसारित केलेल्या राजर्षी छत्रपती शाहू महाराज तिकीटाची पोस्ट स्टॅम्प प्रतिमा रांगोळीच्या सहाय्याने स्पर्शरंग कला परिवाराचे विपुल मिरजकर व सागर भारती यांनी 10×14 फुट काढली आहे. रांगोळी काढण्यासाठी 30 तास वेळ लागलेली आहे. 5 रंगाचा वापर केलेली आहे.









