प्रतिनिधी / श्रीपूर
केंद्रीय लोकसेवा आयोगाने 2019 मध्ये घेतलेल्या परीक्षांचा निकाल आज जाहीर झाला असून, यामध्ये माळशिरस तालुक्याच्या पूर्व भागातील वाघोली गावचे सुपुत्र सागर भारत मिसाळ यांनी घवघवीत यश संपादन केले आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की , तालुक्यातील वाघोली येथील सागर भारत मिसाळ यांना यूपीएससी परीक्षेत 204 वा रँक मिळाला आहे. विशेष म्हणजे सागर यांचे शालेय शिक्षण वाघोली येथील जि. प. शाळेत झाले आणि उच्च माध्यमिक शिक्षण हे अकलूज येथे झाले असून कृषी शास्त्रात त्यांनी पदवी संपादन केली आहे.
वाघोली सारख्या ग्रामीण भागात शिक्षण घेऊन सागर मिसाळ यांनी दुसर्या प्रयत्नात यूपीएससी परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे. कठोर मेहनत आणि सरावात सातत्य राखत सागर यांनी अभिमानास्पद यश प्राप्त केले असल्याने संपूर्ण राज्यातून सागर मिसळ यांच्यावर कौतुकाचा वर्षांव होत आहे.









