प्रतिनिधी / सोलापूर
किराना दुकान, भाजी मार्केट व यापूर्वी परवानगी दिलेल्या दुकानांबरोबर यापुढे 5 ऑगस्ट पासुन शहरातील मॉल्स, मार्केट कॉम्प्लेक्स सकाळी 9 ते सायं 7 या वेळेत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे, तसे आदेश मनपा आयुक्त पी. शिवशंकर यांनी शुक्रवारी सायंकाळी जारी केले आहेत.
नविन जारी केलेल्या आदेशात म्हटले आहे की, शहरातील मॉल्स, मार्केट कॉम्प्लेक्स सकाळी 9 ते सायं 7 या वेळेत सुरू ठेवण्यास परवानगी असली तरी यामधील थिएटर, फ़ूड़कोर्ट आणि रेस्टॉरंट बंदच राहणार आहेत. यातील फ़ूड़कोर्ट व रेस्टॉरंट फक्त होम डिलीव्हरीसाठी सुरु राहतील. यापूर्वी मंजुरी दिलेली बांधकामे सुरु राहतील. क्रिडा संकुल, स्टेडीयम च्या बाह्य भागात व्यायामास परवानगी आहे, परंतू कोणतेही सांघिक सामने घेता येणार नाहीत. जलतरन तलाव बंदच राहतील.
दुचाकीवर डबलसीटला परवानगी
यापुढे नागरिकांना दुचाकीवर डबलसीट फिरता येणार. मात्र हेल्मेट व मास्क वापरणे बंधनकारक आहे. तसेच चारचाकीमध ही एकून 4 (1+3), रिक्षा मधे एकून 3 (1+2) जनांना प्रवास करण्यास परवानगी देण्यात आली आहे.
Previous Article5 महिन्यात 947 टक्क्मयांहून अधिक डाटा विक्री
Next Article टाटा कॅपिटलची बायोकॉनमध्ये गुंतवणूक








