प्रतिनिधी / कुर्डुवाडी
माढा तालुक्यात आज ७० कोरोना बाधित असल्याचा अहवाल तालुका आरोग्य प्रशासनाला प्राप्त झाला असून तालुक्यातील आजपर्यंत बाधितांचा आकडा १७७८ झाला असून त्यापैकी ९२६ जणांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे. उर्वरित ८५२ जणांवर उपचार सुरु आहेत. तर,आजपर्यंत तालुक्यातील ५१ जणांचा मृत्यू झाला आहे. आज कुर्डुवाडी ,माढा, भोसरे, तांदुळवाडी, बेंबळे, मोडनिंब,भुताष्टे, अरण ,टेंभुर्णी येथे हे कोरोना बाधित रुग्ण आढळले असल्याचे तालुका आरोग्य विभागाचे संतोष पोतदार यांनी सांगितले.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कुर्डुवाडी शहराता गेल्या पाच दिवसांपासून जनता कर्फ्यू पुकारला होता.या कर्फ्यू दरम्यान नगरपालिकेच्या आवाहनानुसार नागरिक व व्यापाऱ्यांनी आपली अन्टीजेन चाचणी केली. दररोज सुमारे २०० चाचणी घेतल्या जात होत्या. या चाचणी मध्ये सुमारे १५ टक्के लोक बाधित असल्याचे समोर येत होते.
आज झालेल्या चाचणीत कुर्डुवाडी येथे १६ तर तालुक्यात इतर ठिकाणी माढा येथे २,भोसरे येथे २,तांदुळवाडी येथे २०, बेंबळे येथे १,मोडनिंब येथे ७,भुताष्टे येथे १८,अरण येथे २,टेंभुर्णी येथे १,वडाचीवाडी येथे १ असे एकूण ७० जण कोरोना बाधित असल्याचे समोर आले आहे. सदरच्या बाधित व्यक्तींच्या संपर्कातील व्यक्तींची माहिती तालुका आरोग्य विभागाकडून घेतली जात आहे. ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून दिवसेंदिवस बाधितांचा आकडा वाढत असून नागरिकांनी आता स्वतः हून खबरदारी घेणे गरजेचे आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









