प्रतिनिधी / कुर्डुवाडी
माढा तालुक्यात आज नव्याने एकूण ३६ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचा अहवाल तालुका आरोग्य विभागाला प्राप्त झाला असून तालुक्यातील बाधितांचा आकडा २८४ वर पोहचला आहे. यामध्ये लऊळ येथील एक महिलेचा काल मृत्यू झाला असल्याचे तालुका आरोग्य विभागाचे संतोष पोतदार यांनी सांगितले.
आज कुर्डुवाडी येथील नूतन हायस्कूल जवळील एका व्यक्तीस कोरोनाची लागण झाली असल्याचा अहवाल प्राप्त झाला. याचबरोबर कुर्डू, रिधोरे, लऊळ, पापनस, उपळाई बु. आलेगाब बु. येथे पूर्वीच्या बाधित रुग्णांच्या संपर्कातील तर काही नव्या लोकांची रॅपीड टेस्ट घेतली असता कुर्डू येथे १, लऊळ येथे १८, रिधोरे १२, पापनस येथे २ तर उपळाई बु. व आलेगाव बुं येथे प्रत्येकी १ जण कोरोना बाधित असल्याचे समोर आले. तालुक्यात रिधोरे, पापनससह आता लऊळचाही अहवाल चिंताजनक असून छोट्या गावात एवढ्या मोठ्या प्रमाणात एकावेळी बाधित रुग्ण सापडणे हे प्रशासनाच्यादृष्टीनेही मोठी चिंताजनक बाब आहे. आजही लोक गावात मुक्तसंचार करतात शिवाय प्रशासनाला खरी माहिती देत नाहीत. यामुळे बाधितांचा आकडा वाढत असल्याचे बोलले जात आहे. सदरच्या बाधित व्यक्तींच्या संपर्कातील व्यक्तींची तालुका आरोग्य विभागाकडून घेतली जात असून सदरचा परिसर कंटेन्मेंटझोन करुन प्रतिबंधीत करण्यात आला आहे.
Previous Articleइचलकरंजी मुख्याधिकारी पदाचा कार्यभार दीपक पाटील यांच्याकडे
Next Article आगळं-वेगळं केरळ








