प्रतिनिधी / कुर्डुवाडी
माढा तालुक्यात आज २२ जण कोरोना बाधित असल्याचा अहवाल तालुका आरोग्य प्रशासनाला प्राप्त झाला असून माढा, मोडनिंब, सापटणे टे, परिते, पिंपळनेर, शिराळा मा, दहिवली, टेंभुर्णी, लऊळ येथे हे कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत.
तालुक्यात माढा येथे ४,मोडनिंब येथे १, सापटणे टे येथे १, परिते येथे २, पिंपळनेर येथे १, शिराळ मा येथे ५, दहिवली २ ,टेंभुर्णी येथे ३, लऊळ येथे ३ जण कोरोना बाधित असल्याचे समोर आले आहे. तालुक्यातील एकूण बाधितांचा आकडा ३४५१ झाला असून यामधील ३१८० बाधित रुग्ण उपचारानंतर बरे होऊन घरी परतले आहेत. आतापर्यंत ११८ जणांचा मृत्यू झाला आहे. तर उर्वरित १५३ जणांवर उपचार सुरु असल्याचे तालुका आरोग्य विभागाचे संतोष पोतदार यांनी सांगितले. नागरिकांनी गाफील न राहता सतर्क राहून नियमांचे पालन करणे गरजेचे आहे.









