प्रतिनिधी / कुर्डुवाडी
माढा तालुक्यात शनिवारी एकूण २१ कोरोनाबाधितांची भर पडली. प्रथमच माढा तालुक्यात दोन अंकीमध्ये बाधितांचा अहवाल आला आहे. त्याचबरोबर कुर्डुवाडी कनेक्शन मुळे माढा शहरात कोरोनाची पहिली एन्ट्री झाली आहे.
यापूर्वीच शुक्रवारी सकाळी ५ तर सायंकाळी आणखी ३ बाधित रुग्णांची भर पडली. तालुक्यात आता एकूण बाधित रुग्ण संख्या ६२ वर जाऊन पोहचली असून सध्या अॅक्टीव्ह ४५ कोरोनाबाधित रुग्ण उपचार घेत असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत पलंगे यांनी दिली. बाधित रुग्णांमध्ये उंदरगाव येथील ३ , कुर्डुवाडी ८, माढा १, रिधोरे ७,अकोले बु.२ रुग्णांचा समावेश आहे.
कुर्डुवाडी शहराचा वाढता धोका पहाता नगरपालिका प्रशासनाने व्यापारी संघटनेची बैठक बोलावून जनता कर्फ्यू करण्याबाबत मते जाणून घेतली. यावेळी व्यापाऱ्यांनी जनता कर्फ्यूचे समर्थन केले. त्यामुळे सर्वांच्या संमतीने सोमवार दि. २० रोजी पासून २७ जुलै असा आठ दिवसांचा कर्फ्यू जाहीर करत असल्याचे नगराध्यक्ष समीर मुलाणी यांनी सांगितले.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








