प्रतिनिधी / कुर्डुवाडी
माढा तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून सोमवारी प्राप्त झालेल्या अहवालानुसार माढा तालुक्यातील २० गावातून एकूण ६८ जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर १४ जणांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे. यामध्ये कन्हेरगाव येथील एका पुरूषाचा मृत्यू झाला आहे.
माढा तालुक्यातील धानोरे येथे तब्बल २३ रुग्ण आढळले असून मानेगाव येथे ३, विठ्ठलवाडी येथे ४, उपळाई खु.येथे १,सोलनकरवाडी येथे २,बावी येथे १, उपळवटे येथे १, पिंपळनेर येथे २, कन्हेरगाव येथे ९, फुटजवळगाव येथे १, अकोले बु.येथे १, टेंभुर्णी येथे ७, वडाचीवाडी त.म.येथे १, भोसरे येथे १, अकुलगाव येथे १, जाधववाडी मो. येथे २, मोडनिंब येथे १,आढेगाव येथे २,माढा येथे १,कुर्डुवाडी येथे ४ असे एकूण ६८ जण कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. कोरोनाचा वरचेवर उद्रेक वाढत असून नागरिकांनी सतर्कता बाळगली पाहिजे. प्रशासनानेही जास्तीत जास्त कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करुन तपासण्या वाढवण्याची गरज आहे.









