प्रतिनिधी / कुर्डुवाडी
कुर्डुवाडी शहरात आज १५ जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले असून शहरात पंढरपुर रोडवरील बाधित शिक्षक तथा बँकेच्या संचालकाच्या संपर्कातील एकूण ५ जणांसह आणखी १ जण नव्याने बाधित झाले आहे. तसेच भीमनगर येथे १, टेंभुर्णी रोडवरील बाधित डॉक्टरांच्या संपर्कातील २ व रेल्व कॉलनी येथील ५ जण व माढा रोडवरील १ जण बाधित असल्याचे ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ.संतोष अडागळे यांनी सांगितले. तसेच कुर्डुवाडीसह माढा तालुक्यात चिंचगाव (चिंकहिल), भोसरे, रिधोरे ,
कुंभेज,केवड, अरण , कुर्डू याठिकाणी ही बाधित रुग्ण आढळले असून तालुक्यात आज एकूण ३३ बाधित रुग्ण आढळले असल्याचे तालुका आरोग्य विभागाचे संतोष पोतदार यांनी सांगितले.
चिंचगाव (चिंकहिल) ४,भोसरे ७, रिधोरे १,कुंभेज ३,केवड १,अरण १,कुर्डू १ याप्रमाणे तालुक्यात एकूण ३३ रुग्ण कोरोना बाधित झाले असून त्यांचा राहता परिसर प्रतिबंधित करुन संपर्क यादी घेतली जात आहे. आज एकूण ५० हायरिस्क संपर्कातील लोकांचा स्वॅब घेण्यात आला आहे. त्याचा अहवाल येणे बाकी आहे. तालुक्यातील आजपर्यंत बाधितांची संख्या ६३९ अशी झाली असून त्यापैकी ४२९ जण बरे होऊन घरी गेले आहेत तर आजपर्यंत २० जणांचा मृत्यू झाला असल्याचे अरोग्यविभागाकडून सांगण्यात आले.
Previous Articleकोल्हापूर जिल्हय़ातील बाजार समित्या आज राहणार बंद
Next Article सांगली : तासगाव शहरात कोरोनाने घेतले दोन बळी









