प्रतिनिधी / कुर्डुवाडी
कुर्डुवाडी शहरात महात्मा फुले चौकात आज नव्याने २ जण कोरोना बाधित झाले असल्याचे ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ.संतोष अडागळे यांनी सांगितले.तसेच कुर्डुवाडीसह माढा तालुक्यात केवड, रांझणी, आढेगाव, कुंभेज, रिधोरे, मोडनिंब, पिंपळखुंटे, बावी, अंजनगाव (उ) , टेंभुर्णी, भोसरे याठिकाणी ही बाधित रुग्ण आढळले असून तालुक्यात आज एकूण ६२ बाधित रुग्ण आढळले असल्याचे तालुका आरोग्य विभागाचे संतोष पोतदार यांनी सांगितले.
माढा तालुक्यात ग्रामीण भागात कोरोनाचा कहर वाढतच चालला असून आज केवड येथे २४ तर कुंभेज येथे एकदम १५ जण बाधित असल्याचे समोर आले असून, रांझणी ५, आढेगाव १, रिधोरे १, मोडनिंब ३, पिंपळखुंटे १, बावी १, अंजनगाव (उ) ४ , टेंभुर्णी ४, भोसरे १ असे एकूण ६२ रुग्ण रुग्ण कोरोना बाधित झाले असून त्यांचा राहता परिसर प्रतिबंधित करुन संपर्क यादी घेतली जात आहे. नागरीक अजूनही घाबरुन घरात बसून आपल्याला होणारा त्रास प्रशासनापासून दडवत आहेत. परंतू नागरिकांनी घाबरुन न जाता समोर येऊन नजीकच्या दवाखान्यात तपासणी करावी . जेणेकरुन आपल्या परिवाराला व इतरांना याची बाधा होणार नाही.
माहिती दडवू नका वेळीच उपचार घेतल्याने होणारा संसर्ग रोखता येईल तरी नागरिकांनी माहिती दडवून न ठेवता समोर येऊन तपासणी करुन प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन वैद्यकीय अधिक्षक डॉ.संतोष अडागळे व आरोग्य निरीक्षक तुकाराम पायगण यांनी केले आहे. तालुक्यातील आजपर्यंत बाधितांची संख्या ७०१ अशी झाली असून त्यापैकी ४४२ जण बरे होऊन घरी गेले असल्याचे अरोग्यविभागाकडून सांगण्यात आले आहे.
Previous Articleफ्लिपकार्ट आता करणार नेपाळमध्ये विक्री
Next Article 13 फॉरेक्स कंपन्यांचा आरबीआयकडून परवाना रद्द









