प्रतिनिधी / कुर्डुवाडी
माढा तालुक्यात आज २६ कोरोना बाधितांची वाढ झाली असल्याचा अहवाल तालुका आरोग्य प्रशासनाला प्राप्त झाला असून पिंपळनेर, मोडनिंब, लऊळ, रणदिवेवाडी, टेंभुर्णी माढा येथे हे कोरोना बाधित रुग्ण आढळले असून तालुक्यातील एकूण बाधितांचा आकडा ५३१ झाला असल्याचे तालुका आरोग्य विभागाचे संतोष पोतदार यांनी सांगितले.
तालुक्यात पिंपळनेर येथे ४, मोडनिंब येथे ९, लऊळ येथे ३, रणदिवेवाडी येथे ६, टेंभुर्णी येथे २,माढा येथे २ असे २६ जण कोरोना बाधित असल्याचे समोर आले आहे. सदरच्या बाधित व्यक्तींच्या संपर्कातील व्यक्तींची माहिती तालुका आरोग्य विभागाकडून घेतली जात असून सदरचा परिसर कंटेन्मेंट झोन करुन प्रतिबंधीत करण्यात आला आहे. ग्रामीण भागात रोज नवनवीन गावात कोरोनाबाधित रुग्ण सापडत असल्यामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे.
Previous Articleआधी धनाचा मेवा नंतरच धन्वंतरीची सेवा!
Next Article आयटीबीपीच्या आणखी 27 जवानांना कोरोना









