प्रतिनिधी / कुर्डुवाडी
माढा तालुक्यात आज आणखी २७ जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. तालुक्यात आता बाधितांचा आकडा दोनशेच्या पार गेला असून तालुक्यातील एकूण बाधित रुग्णांची संख्या २०२ वर पोहचली आहे.
माढा तालुक्यातील बाधितांची संख्या वरचेवर वाढत असून प्रशासनाची डोकेदुखी वाढत आहे .पापनस मध्ये कोरोना बाधित रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळत आहेत.आज पापनस येथे ४ बाधित रुग्ण आढळले. तसेच सुलतानपुर येथे ८ तर,मुंगशी येथे ९,पडसाळी २ ,मोडनिंब १ व माढा येथे ३ बाधित रुग्ण आढळले आहेत. तालुक्यात आज असे एकूण २७ बाधित रुग्ण असल्याचा अहवाल आज प्राप्त झाला असल्याचे तालुका आरोग्य विभागाचे संतोष पोतदार यांनी सांगितले.
तर रिधोरे व कुर्डुवाडी येथे आज एकही बाधित रुग्ण आढळला नाही ही प्रशासनाच्या व नागरिकांच्या दृष्टीने समाधानकारक बाब आहे. वरील बाधित रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींची यादी तालुका आरोग्य प्रशासनाकडून घेतली जात आहे. माढा तालुक्याने आता द्विशतकाचाही टप्पा ओलांडला आहे. नागरिकांनी आता खबरदारी घेण्याची गरज आहे. रोज नवनवीन गावात कोरोनाचा शिरकाव होत आहे. गावकऱ्यांनी विनाकारण एका गावातून दुसऱ्या गावात प्रवास करु नये केला तर सर्वोतोपरी खबरदारी घेऊन प्रवास करावा. प्रशासनाला योग्य ती माहिती द्यावी.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








