प्रतिनिधी / अक्कलकोट
जेऊर येथील 31 वर्षीय महिला 29 जुलै रोजी सकाळी 11.00 वाजता शेतात काम करीत असताना लज्जास्पद कृत्य करत विनयभंग केल्याबद्दल अक्कलकोट तालुक्यातील जेऊर येथील एकावर विनयभंगाचा गुन्हा अक्कलकोट दक्षिण पोलिस ठाण्यात नोंद झाला आहे.
या घटनेची फिर्याद पीडितेने दिली आहे. संशयित आरोपीचे नाव सुरेश शंकर गुजले रा.जेऊर ता.अक्कलकोट असे आहे. पीडिता शेतात काम करीत असताना गावातील एका शेतात चाकरीस असणारा सुरेश शंकर गुजले हा तेथे येत त्याने लज्जास्पद वर्तन केले. संशयित आरोपीवर दक्षिण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.