तरुण भारत संवाद प्रतिनिधी / सोलापूर
महापालिका आयुक्त पी. शिवशंकर हे आजारी पडले आहेत. परिणामी त्यांचा स्वॅब तपासणीसाठी घेतला होता. त्या स्वॅबची तपासणी झाली असुन महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांचा रिपोर्ट ‘कोरोना पॉझिटीव्ह’ आला असल्याची माहिती पालकमंत्रि दत्तात्रय भरणे यांनी सोमवारी दिली.
महापालिकेच्या अधिकाऱ्यांना रविवारी सकाळपासून सर्दी, ताप, डोकेदुखीचा त्रास सुरु होता. त्यामूळे त्यांचे स्वॅब घेण्यात आले होते. त्याचा अहवाल सोमवारी सायंकाळी आला असुन यामध्ये महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांना कोरोना झाल्याचे पालकमंत्रि दत्तात्रय भरणे यांनी सांगितले. परिणामी आयुक्त पी. शिवशंकर यांना होम क्वॉरंटाईन केले आहे. ते घरुनच कामकाज पाहणार आहेत. तर नुकतेच रुजू झालेले अतिरिक्त आयुक्त विजय खोराटे हे महापालिकेचे काम पाहणार आहेत. जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या बरोबर व इतर अधिकाऱ्यांबरोबर महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांचा बैठकीच्या दरम्यान संपर्क झाल्याने जिल्हाधिकारी यांना देखील सध्या कोणतेही लक्ष नसले, तरी घरूनच कामकाज करण्यासंदर्भात सूचना दिल्या असल्याचे पालकमंत्री भरणे यांनी यावेळी सांगितले.
गृहमंत्री, आरोग्यमंत्री यांच्या संपर्कात आले आयुक्त
दोन दिवसांपूर्वी राज्याचे गृहमंत्री अनिल देश्मुख, आरोग्यमंत्री राजेश टोपे हे सोलापुर दौऱ्यावर आले होते. या दौऱ्यानिमित्त विविध ठिकाणी बैठका झाल्या. यामध्ये जिल्हा प्रशासन, मनपा प्रशासन, आरोग्य विभागातील अधिकारी सहभागी होते. यावेळी बैठकीदरम्यान आयुक्त शिवशंकर या सर्वांच्या संपर्कात आले होते. त्यामूळे या बैठकादरम्यान उपस्थीत सर्वांच्या तपासण्या केल्या जाणार का ? असा प्रश्न सर्वसामान्यांमधून उपस्थित केला जात आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








