प्रतिनिधी / सोलापूर
सोलापूर महापालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये नगरसेविका अनुराधा काटकर यांनी उद्यान अधिक्षक निशिकांत कांबळे यांनी केलेल्या रोपे खरेदी बाबत प्रश्न उपस्थीत केला होता. परिणामी या प्रकरणाबाबत महापौर श्रीकांचना यन्नम यांनी कांबळे यांची चौकशी करुन निलंबित करण्याचे आदेश दिले होते. सदरच्या प्रकरणाबाबत मनपा आयुक्त पी. शिवशंकर यांनी उद्यान अधिक्षक कांबळे यांना सक्तीच्या रजेवर पाठवले आहे.
महाराष्ट्र शासनाने ३३ कोटी वृक्ष लागवडची उद्दीष्ठ होते. यामध्ये उद्यान अधिक्षक निशिकांत कांबळे यांनी 2019 मध्ये 8 हजार रोप खरेदी केली होती. या खरेदीमध्ये अपहार झाल्याचे निदर्शनास आणुन देण्यासाठी लक्षवेधी घेतली होती. तसेच खरेदी केलेली रोपे कुठे लावली, कोणाला कीती दिली, लावलेल्या रोपांपैकी किती रोपे जिवंत आहेत, याची चौकशी नगरसेविका काटकर यांनी भेट देऊन केली.
त्यावेळी सदरच्या ठिकाणी रोपे ही नाहीत आणि रोपे लावण्यासाठीचे खड्डे पण अस्तित्वात नसल्याचे नगरसेविका काटकर यांना निदर्शनास आले. परिणामी नगरसेविका काटकर यांनी उद्यान अधिक्षक कांबळे यांना निलंबित करा, अशा मागणीचे पत्र महापालिका आयुक्तांना दिले होते. तसेच सर्सवसाधारण सभेत प्रश्न उपस्थीत केला होता. यावेळी सभागृहातील इतर सर्व नगरसेवकांनी कांबळेना निलंबित केलेच पाहिजे, अशी मागणी केली. महापौर यन्नम यांनी ही चौकशी करुन निलबंनाची कारवाई करण्याचे आदेश दिले होते. याबाबत चौकशीचा भाग म्हणून आयुक्त पी. शिवशंकर यांनी उद्यान अधिक्षक कांबळे यांना सक्तीच्या रजेवर पाठवले असल्याचे नगरसेविका काटकर यांनी सांगितले.









