पोलीस अधिकाऱ्यासहित २८ कैद्यांचा समावेश
तरुण भारत संवाद मारोळी/प्रतिनिधी
अलिकडच्या काही दिवसात मंगळवेढा शहरासह ग्रामीण भागात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहेत. ग्रामीण रुग्णालय मंगळवेढा यांच्या मार्फत ११९ रॅपीड अॅन्टीजन टेस्ट घेण्यात आल्या. याचा अहवाल काल, शुक्रवारी (दि.१७) रात्री उशिरा प्राप्त झाला. यामध्ये सबजेल मंगळवेढा येथील ४० कैदयांचा समावेश आहे. ४० कैदयामधील २८ कैदयांची,०१ पोलीस अधिकारी,०२ सुरक्षारक्षक, ०१ सबजेल मधील आहार पुरवठादार असे एकूण ३२ जणांचे रॅपीड अॅन्टीजन टेस्ट पॉझिटिव्ह आलेले आहेत. उर्वरीत १२ जणांची टेस्ट निगेटिव्ह आलेली आहे. सर्व १२ जणांना तहसिल कार्यालय मंगळवेढा येथे तात्पुरते जेल स्थापन करून विलगीकरण करणेत येत आहे.
पॉझिटिव्ह व्यक्तींचे त्यांचे निकट संपर्कात आणि कमी संपर्कात असलेल्या व्यक्तींचे वैद्यकीय सर्वेक्षणाचे कामकाज आरोग्य विभागामार्फत सुरू करण्यात आलेले आहे. आवश्यकतेनुसार पुढील कारवाईसाठी प्रशासन सज्ज आहे असे आवाहन उपविभागीय अधिकारी श्री.उदयसिंह भोसले यांनी सांगितले.
संस्थात्मक विलगीकरण केलेल्यांमधील सलगर बुद्रूक प्राथमिक आरोग्य केंद्रातील ०२ कर्मचारी पॉझिटिव्ह आढळून आले. तर नंदूर येथील रुग्णाशी संबंधित असलेल्याची निकट संपर्काततील २२ जणांचे रॅपिड ऍटिजेन टेस्ट निगेटिव्ह आली. सलगर बुद्रूक प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी पॉझिटिव्ह आढळून आल्यामुळे संबंधित असलेल्या ४१ कर्मचाऱ्यांची रॅपिड टेस्ट घेण्यात आली. त्यामध्ये ३९ रिपोर्ट हे निगेटिव्ह आले, तर ०२ रिपोर्ट पॉझिटिव्ह आले. यापूर्वी रुग्णाशी संबंधित कर्मचाऱ्यांना संस्थात्मक विलगीकरण करण्यात आले होते. व ३०५ लोकांना होम क्वारंटाईन करण्यात आले.
Previous Articleइराणने भारताला फरजद-बी वायू प्रकल्पातून वगळले
Next Article मडगावचे रस्सा आमलेट प्रणेते अशोक नाईक निवर्तले









