प्रतिनिधी / सोलापूर
सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातील मौजे जंगलगी येथील पक्षी बर्ड फ्लू सदृश्य रोगाने मृत्यू झाल्याने नियंत्रित क्षेत्र म्हणून जंगलगी व त्यालगत दहा किलोमीटर क्षेत्रातील परिसर (अलर्ट झोन) सतर्क भाग म्हणून घोषित करण्याचा आदेश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आज गुरुवारी दिले आहेत.
मुंबई, लातूर, परभणीनंतर सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातील जंगलगी गावात बर्ड फ्लूची लक्षण आढळून आल्यामुळे एक पक्षी मृत्यू झाल्याने मंगळवेढा तालुक्यात खळबळ उडाली आहे. दरम्यान जिल्हाधिकारी शंभरकर यांनी आदेश काढून या ठिकाणातील दहा किलोमीटर परिसर म्हणून घोषित केले आहे. जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त सोलापूर व जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, जिल्हा परिषद सोलापूर यांना उपाययोजनांसाठी आदेश देण्यात आले आहे.