स्मार्ट सिटीने रेल्वे प्रशासनाला भरले 75 लाख रुपये
प्रतिनिधी / सोलापूर
सोरेगाव ते उजनी या दुहेरी जलवाहिनीसाठी 95 किमी अंतरावरील कृषी पंचनामे,प्रमुख जिल्हा मार्ग व इतर जिल्हा मार्ग तसेच रेल्वे क्रॉसिंग आदींचा सर्व्हे पूर्ण झाले आहे. हा आराखडा शासनाकडे प्रस्ताव सादर करण्यात येणार असल्याची माहिती सीईओ त्र्यंबक ढेंगळे-पाटील यांनी दिली.
सोरेगाव ते उजनी या पहिल्या टप्प्यातील 18 किमी पैकी सात किमी पाईपलाईन टाकून पूर्ण झाले आहे. तर 95 किमी अंतरावरील कृषी पंचनामे, क्रॉसिंग जिल्हा मार्गासह इतर मार्ग, सीना नदी, रेल्वे क्रॉसिंग आदी सर्व गोष्टींचा संबंधित विभागाकडून सर्व्हे करण्यात आला. तसेच भूसंपादनाचा आराखडा पूर्ण करून हा प्रस्ताव शासनाकडे सोमवारपर्यंत सादर करण्यात येणार आहे. तीन रेल्वे क्रॉसिंगच्या कामाकरिता रेल्वे प्रशानाला 75 लाख रुपये स्मार्ट सिटीकडून भरण्यात आले आहेत. त्यामुळे या जलवाहिनीला गती मिळत आहे. पहिल्या टप्प्यातील सोरेगाव ते पाकणी 26 कि.मी.चा टप्पया फेब्रुवारी अखेरपर्यंत पूर्ण होईल. जिल्हा प्रशासन व मनपा प्रशासन यांचेही सहकार्य मिळत असल्याचेही सीईओ ढेंगळे – पाटील यांनी दिली.
या शेतकर्यांवर होणार गुन्हा
स्मार्ट सिटीच्यावतीने 95 किमी अंतरावरील शेतकर्यांच्या भूसंपादनाचा सर्व्हे करण्यात आला होता. त्यानंतर नुकतेच कृषी विभागाकडून झालेल्या सर्व्हेमध्ये अनेक शेतकर्यांनी प्रशानाकडून अधिक पैसे उकळण्यासाठी फळझाडांची नोंदी केली आहेत. यापूर्वी झालेला मूळ सर्व्हे आणि नव्याने झालेल्या सर्व्हेतील शेतकर्यांच्या पिकांची झालेल्या नोंदीची चाचपणी करून बोगसगिरी करणार्या शेतकर्यांची यादी तयार करण्यात आली आहे. अशा शेतकर्यांवर गुन्हा दाखल करण्यात येईल, असेही सीईओ त्र्यंबक ढेंगळे-पाटील यांनी सांगितले.









