प्रतिनिधी / बार्शी
उद्यापासून गणेश उत्सव प्रारंभ होत आहे. बार्शी शहर आणि तालुक्यामध्ये कोणत्याही स्वरूपाचा सार्वजनिक गणेशोत्सव होणार नाही. याबाबत जिल्हा प्रशासनाने आणि जिल्हा पोलिस प्रशासनाने सूचना दिल्या आहेत. त्याप्रमाणे बार्शी शहर पोलीस ठाणे व बार्शी तालुका पोलीस ठाणे यांच्या वतीने सर्व गणेश मंडळांना सूचना दिलेल्या आहेत. वेळोवेळी सर्व गणेश मंडळाची बैठक घेऊन कोणत्याही प्रकारे मोठ्या स्वरुपात, गर्दी करून गणेशोत्सव साजरा करू नये असे आवाहन केले आहे. त्यात दरवर्षी प्रत्येक गल्लोगल्ली लहान मुले बाल गणेश मंडळ स्थापन करत असतात आणि या बाल गणेश मंडळाच्या वतीने ही गल्लो गल्ली गणेश उत्सव मोठ्या उत्साहात आणि दिमाखात साजरा केला जात असतो.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव बार्शी शहर आणि तालुक्यात पाहता आता बाल गणेश मंडळाने ही कुठेही ही सार्वजनिक स्वरूपाचा गणेशोत्सव साजरा करू नये अशा सक्त सूचना बार्शी तालुका पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी जायपत्रे यांनी दिले आहेत. जर कुठे बार्शी तालुक्यात बाल गणेश मंडळ स्थापन झाली आणि मोठ्या स्वरूपात बाल गणेश मंडळाच्या वतीने गणेशोत्सव साजरा करण्यात आला तर ज्या मुलांनी हा उत्सव केला आहे. त्यांच्या पालकांवर गुन्हे दाखल करणार असल्याचे तालुका पोलिसांच्या वतीने सांगण्यात आले आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









