प्रतिनिधी / बार्शी
कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव वाढत असताना संपूर्ण राज्य संचार बंदीच्या छायेखाली होते. या कठीण प्रसंगी अनेक शासकीय विभाग आणि इतर शासकीय आस्थापना तसेच सर्व बँका ही नागरिकांना अविरत सुविधा देण्याचे काम करत होत्या, तर काही बँकांनी कोरोना काळात गोरगरिबांसाठी खूप चांगले कार्य केल्याचे अनेक वेळा पुढे आले आहे. आता याच बँकेत काम करणारे कर्मचारी कोरोना बाधित आढळत आहेत. आज बार्शी स्टेट बँक ऑफ इंडिया बार्शी शहर शाखेतील दोन कर्मचारी कोरोना बाधित आढळल्याने आज बँक बंद होती.
आता स्टेट बँक ऑफ इंडिया बार्शी शाखेतील इतर कर्मचार्यांच्या तपासणी चालू असून काही कर्मचारी यांच्या टेस्ट निगेटिव्ह आल्या आहेत. तर काही कर्मचारी यांचे नमुने सोलापूरला पाठवले असल्याने त्यांचे अहवाल येणे पर्यंत बँक बंद राहणार अशी माहिती मिळत आहे. तर सर्व कर्मचारी यांचे तपासणी झाल्यानंतर पूर्ण बँक निर्जंतुक करूनच चालू करण्याचा मानस असल्याचे समजले आहे. तर आता स्टेट बँक ऑफ इंडियातील कर्मचारी कोरोना बाधित आल्यामुळे या कर्मचाऱ्यांच्या संपर्कात येणाऱ्यांची संख्या जास्त असू शकते अशी शंका प्रशासनाला येत आहे.
Previous Articleसिंधुदुर्गच्या सुपुत्राची गौरवास्पद कामगिरी
Next Article रत्नागिरी : आरवली येथील अपघातात दुचाकी चालक ठार









