प्रतिनिधी / वैराग
बार्शी – सोलापूर रोडवर चिखलमय रस्त्यांनी अनेक वाहने झाली पलटी. बार्शी रोडवर दडशिंगे ( ता. बार्शी ) पाटीजवळ रस्त्याचे काम सुरू असल्याने मोठा चिखल होऊन अनेक दुचाकी, चारचाकी वाहने पलटी झाल्याचा प्रकार झाला. दोन दिवस झालेल्या पावसाने या मार्गावरील प्रवाशी बेजार झाले आहेत. चिखलात पडून गाड्या नादुरुस्त तर प्रवासी तर प्रवासी जखमी झाल्याचे प्रकार घडले आहेत. बार्शी तालुक्यातील मोठ्या वर्दळीचा असलेला बार्शी सोलापूर रोड बार्शी – सोलापूर रोड सध्या नवीन करण्याचे काम सुरू आहे. मात्र या भागात दोन दिवस झालेल्या पावसामुळे रस्त्याची दुरावस्था झाली आहे. हा रस्ता अरुंद असून साईडला मोठमोठे खड्डे दगडे व चिखलय बनले आहेत.
यामुळे वाहनधारकांची मोठी पंचायत व कसरत होत आहे. चिखलामुळे दुचाकी जागेवर थांबल्या त्याच्यामुळे पाठीमागून येणारी वाहने एकमेकांवर आदळून अपघात झाले. तर चाकीचार वाहने घसरली जात होती. एक चाकी क्लुजर जीप बोलेरो मालवाहतूक छोटा – हत्ती असे तीन वाहने खड्यात पडली. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवीत्तहानी झाली नसली तरी वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. शिवाय एसटी महामंडळाच्या बसेस या ठिकाणी रस्ता सोडून दुसरीकडे धावल्या. यात क्लुजर जीप क्रमांक – एम एच १३ सी एस ३२०७ ही पलटी होऊन गाडीची वरचाके झाले होती. यातील चालकासह तिघे किरकोळ जखमी झाले. – त्यात मोठे नुकसान झाले आहे वाहन चालकांनी रस्त्याच्या परिस्थितीचा अंदाज घेऊन वाहने सावकाश चालवा. व होणारे अपघात टाळावे. असा सल्ला पोलीस प्रशासनाने केला आहे.









