प्रतिनिधी / बार्शी
बार्शी नगर परिषदेचे मुख्याधिकारी शिवाजी गवळी यांची बदली झाली असून त्यांच्या जागी आता अमिता दगडे पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अमिता दगडे पाटील यांनी आज बार्शी नगरपालिकेच्या मुख्याधिकारी पदाचा कार्यभार स्वीकारला असून शिवाजी गवळी यांना निरोप देण्यात आला आहे. शिवाजी गवळी यांची कारकीर्द चांगलीच गाजली होती.
काही दिवसांपूर्वी कोरोना विषाणूचा संसर्ग बार्शी शहरांमध्ये वाढत असताना शिवाजी गवळी हे अचानक रजा टाकून घरी बसले होते. मात्र वरिष्ठ अधिकार्यांनी परत त्यांची समजूत घालून त्यांना कामावरती हजर राहण्याचे आदेश दिले होते. कोरोना संकटात बार्शी नगर परिषदेची भूमिका ही महत्त्वाची राहिली आहे. मुख्याधिकारी शिवाजी गवळी शांत आणि संयमी स्वभावाचे असल्याने त्यांच्या कारकिर्दीत त्यांचा कारभार शांत राहिला असला तरी कोरोनाच्या काळामध्ये मात्र सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत अविरत परिश्रम त्यांनी घेतलेले पाहायला मिळाले आता मुख्यअधिकारी पदाचा पदभार अमिता दगडे पाटील यांच्याकडे गेला असून बार्शीमध्ये हे वाढणारा कोरोना विषाणूंचा संसर्ग आणि त्याबाबतच्या उपायोजना या काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचे आव्हान त्यांच्यापुढे असणार आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









