तरुण भारत संवाद प्रतिनिधी / वैराग
शासनाच्या आदेशानुसार आजपासून इयत्ता नववी ते बारावीच्या शाळा सुरू होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर बार्शी तालुक्यातील १९८८ शिक्षक व कर्मचाऱ्यांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी सतरा शिक्षक कर्मचाऱ्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
गेल्या मार्च महिन्यापासून संपूर्ण देशासह महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्यामुळे २२ मार्च पासून शाळा-महाविद्यालये बंद ठेवण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. आता हळूहळू संपूर्ण महाराष्ट्रात अनलॉकची प्रक्रिया सुरू झाल्याने तब्बल आठ महिन्यानंतर आजपासून (२३) नोव्हेंबर पासून इयत्ता नववी ते बारावी वर्ग काही ठिकाणी सुरू करण्यात येणार आहेत. मात्र शाळा-महाविद्यालयातील कार्यरत असलेल्या सर्व कर्मचाऱ्यांना कोरोना तपासणी बंधनकारक करण्यात आली होती. शिक्षक कर्मचाऱ्यांना १७ नोव्हेंबर पासून २३ नोव्हेंबर पर्यंत तपासणी करून त्याचा अहवाल आपल्या कार्यालयात सादर करण्यास सांगण्यात आले होते. यानुसार बार्शी तालुक्यात सात प्राथमिक आरोग्य केंद्र व इतर ठिकाणी कोरोना तपासणीची सोय करण्यात आली होती गेल्या सहा दिवसात बार्शी तालुक्यात १९८८ शिक्षक कर्मचाऱ्यांची कोरोना तपासणी करण्यात आली. यात १७ कर्मचारी पॉझिटिव्ह आले असल्याची माहिती बार्शी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर रमेश खेंदाड यांनी दिली.
बार्शी तालुक्यात २२ नोव्हेंबर अखेर आरटी पीसीआर तपासणी १७ नोव्हेंबर ०/०, १८ नोव्हेंबर ०/०,१९ नोव्हेंबर १५८/०, २० नोव्हेंबर २०/०, २१ नोव्हेंबर ६/०, २२ नोव्हेंबर ८/० एकूण १९२ तपासण्या करण्यात आल्या तर रॅपिड अंतिजेन तपासणी१७ नोव्हेंबर तपासणी ०/ ०, १८ नोव्हेंबर तपासणी ०/०, १९ नोव्हेंबर तपासणी ५०३/०२ पॉझिटिव्ह, २० नोव्हेंबर तपासण्या ७६२/०५ पॉझिटिव्ह, २१ नोव्हेंबर ६५३ /०८ पॉझिटिव्ह २२ नोव्हेंबर ७०/ ०२ पॉझिटिव्ह असा अहवाल प्राप्त झाला आहे.
बार्शी तालुक्यातील चिखर्डे प्राथमिक आरोग्य केंद्रात १५८ तपासण्या त्यापैकी चार पॉझिटिव्ह, तडवळे प्राथमिक आरोग्य केंद्रात १०३ तपासण्या, पानगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात ७२ तपासण्यापैकी एक पॉझिटिव्ह, वैराग प्राथमिक आरोग्य केंद्रात ५७२ तपासण्या त्यापैकी दोन पॉझिटिव्ह, उपळे प्राथमिक केंद्रात १३५ तपासण्या त्यापैकी एक पॉझिटिव्ह, गौडगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात एकशे आठ तपासण्या, आगळगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात १३१ तपासण्या एक पॉझिटिव्ह, ग्रामीण रुग्णालय बार्शी येथे ७०९ तपासण्या दोन पॉझिटिव असे अहवाल प्राप्त झाले आहे. बार्शी तालुक्यात एकूण बारा ठिकाणी शिक्षक कर्मचाऱ्यांसाठी तपासणी केंद्रे होते याठिकाणी बार्शी तालुक्यातील नव्हे तरी इतर तालुक्यातील सुद्धा शिक्षकांच्या तपासण्या करण्यात आल्या यात सतरा जन पॉझिटिव्ह आले आहे.
बार्शी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. रमेश खेंदाड









