प्रतिनिधी / बार्शी
बार्शी तालुक्यातील खामगाव या गावातील युवक शरद भालेराव यांनी आज स्वातंत्र्यदिना दिवशी बार्शी पोलीस विभागीय पोलीस उपअधीक्षक कार्यालय आवारामध्ये झाडावर चढून आत्महत्येचा प्रयत्न केला. यावेळी प्रशासनाने वेळीच प्रसंगावधान दाखवल्याने त्यास आत्महत्येपासून परावृत्त केले मात्र आत्महत्येमागील कारण जाणून घेता पांगरी पोलिसांनी त्याच्यावर केलेला अन्याय आणि पांगरी पोलिसांचे अवैध दारू आणि काळ्या धंद्यामध्ये असलेले पाठबळ आणि भागीदारी असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.
या बाबत सविस्तर वृत्त असे की, पांगरी पोलिस स्टेशनचे तत्कालीन सहायक पोलीस उपनिरीक्षक हुंदळेकर व पांगरी पोलीस कोठावळे, शिरसाट यांच्या सहकार्याने पांगरी पोलीस कार्यक्षेत्रात अवैध दारू आणि इतर अवैध व्यवसाय चालू आहेत. या विषयी वरिष्ठ पोलीस अधिकारी यांना वेळोवेळी तक्रार देऊनही कारवाई होत नाही. त्यामुळे वैतागून खामगावचा युवक शरद भालेकरने आज झाडावर चढून आत्महत्या करण्याचा प्रयन्त केला आहे. या बाबत अधिक चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांच्या संपत्तीची चौकशी करावी अशी मागणी केली आहे.
Previous Articleसोलापूर : कोविड योद्धांना रांगोळीच्या माध्यमातून सलाम
Next Article सांगली : बोरगाव – रेठरे हरणाक्ष बंधारा पाण्याखाली









