प्रतिनिधी / बार्शी
संचारबंदी आणि लॉकडाऊन च्या काळामध्ये महाराष्ट्रातील जनतेला दिलासा मिळावा म्हणून केंद्र शासनाने व राज्य शासनाने प्रत्येक नागरिकास या काळात मदत व्हावी आणि त्यांना पोटाची खळगी भरण्यासाठी कुठेही कमतरता पडू नये यासाठी स्वस्त धान्य दुकानाचे माध्यमातून गहू, तांदूळ आणि इतर वस्तू कमी किमतीत आणि मोफत वाटप करण्याच्या उद्देशाने देण्यात आलेला गहू आणि तांदळाची बार्शी तालुक्यातून होणारा काळाबाजार थांबता थांबेना झाला आहे. बार्शी तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानातील धान्य काळ्या बाजारात नेत असताना पनवेल याठिकाणी 110 टन तांदूळ पनवेल पोलिसांनी पकडला होता. त्यात कालच दिनांक 5 ऑगस्ट रोजी बार्शी मार्केट कमिटीच्या आवारातील उद्धवराव काळदाते यांच्या दुकानातून 151 पोती गहू आणि तांदूळ जप्त केला होता. त्यात आता आज पोलीस आणि महसूल खात्याने बार्शी तालुक्यातील उपळाई ठोंगे या गावापासून काही अंतरावर एका शेतामध्ये बांधकाम चालू असलेल्या बंगल्यातून सुमारे 36 पोती तांदूळ आणि 8 पोती गहू जप्त केला आहे.
गेली आठवडाभर बार्शी तालुक्यातून रेशनच्या धान्याचा होणारा काळाबाजाराचे प्रकरण गाजत असताना आज परत एकदा रेशनचा काळाबाजार मोठ्या प्रमाणामध्ये उघड झाला आहे. बार्शी तालुक्यातील उपळाई ठोंगे या गावापासून काही अंतरावर गणपत गरड यांच्या शेतामध्ये बांधकाम चालू असलेल्या बंगल्यामध्ये आज परत रेशनचा धान्य साठा सापडला आहे. या बंगल्यामध्ये सापडलेला रेशनचा माल उपळाई ठोंगे या गावातील संतोष गरड यांच्या मालकीचे असणाऱ्या रेशन दुकानातील असल्याचे पुरवठा विभागाच्या वतीने सांगण्यात आले.
तर या दुकानावरती शॉप मॅनेजर म्हणून काम करणारे शिवाजी पांगरे हे घटनास्थळी उपस्थित होते . त्यांनी तो माल गरड यांच्या दुकानातील आहे आणि काल रात्री उशिरा स्वस्त धान्य दुकानातून या बंगल्यामध्ये माल हलवला असल्याचे पोलिसांसमोर आणि पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांसमोर कबूल केले आहे. याबाबत बार्शी तालुका पोलीस यांना खबरी मार्फत आज सकाळी खबर मिळाल्याने पोलिसांनी त्या बंगल्यावर छापा टाकून धान्य साठा जप्त केला आहे तर पुरवठा विभागाचे पुरवठा निरीक्षक अभयकुमार साबळे यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन सर्व धान्य जप्त करून तो माल शासकीय धान्य गोडाऊन बार्शी या ठिकाणी आणला आहे. तर या बाबत बातमी पाठवेपर्यंत गुन्हा दाखल झाला नव्हता. मात्र रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल होईल अशी माहिती बार्शी तहसील पुरवठा निरीक्षक अभयकुमार साबळे यांनी दैनिक तरुण भारत संवाद शी बोलताना दिली.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









