तरुण भारत संवाद प्रतिनिधी / बार्शी
तीन महिन्याच्या कठीण व कडक उन्हाळ्यानंतर आज प्रथमच बार्शीत पूर्व मान्सून जोरदार बरसला. आज दुपारी अचानक दोन वाजण्याच्या सुमारास आकाशात ढगांची गर्दी होऊन अगदी साडेतीन वाजल्यापासून ते पाच वाजेपर्यंत मुसळधार पाऊस बार्शी शहर आणि परिसरामध्ये बरसला आहे.
या आलेल्या पावसामुळे ओढे-नाले पूर्ण क्षमतेने भरून वाहत असून बार्शीतील काही रस्त्यांना नदीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. उन्हाळा आल्यानंतर हा पहिलाच पूर्व मान्सून पाऊस बार्शी तालुक्यात मोठ्या स्वरूपात बसला असल्याने वातावरणात एक सुखद दिलासादायक गारवा नागरिक अनुभवत आहेत मात्र ज्यांची घरे खोलगट भागात आहेत त्यांना मात्र या मुसळधार पावसाचा त्रास सहन करावा लागत आहे बातमी पाठवे पर्यंत कोणते नुकसान किती झाले व घडलेले अनुचित प्रकार याबाबत माहिती मिळू शकली नाही.









