प्रतिनिधी / बार्शी
कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव बार्शी तालुक्यात वाढत असून रुग्ण वाढही दैनंदिन होत असल्याचे चित्र समोर येत आहे.
आज सकाळी आलेल्या अहवालानुसार बार्शी शहरात रुग्ण वाढ झाली नाही मात्र ग्रामीण भागात पाच रुग्ण कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. आज आलेल्या अहवालापैकी बार्शी तालुक्यातील वैराग येथील दोन रुग्ण पॉझिटिव्ह आले असून उपळाई ठोंगे गावातील दोन तर वानेवाडीतील एका रुग्णाचा यामध्ये समावेश आहे. आज सकाळी साडेआठपर्यंत बारा अहवाल प्रलंबित असून त्याचेही अहवाल संध्याकाळपर्यंत येणे अपेक्षित आहे.
आज आलेल्या अहवालामध्ये बार्शी शहरातील आठ अहवाल निगेटिव्ह आले असून अजून चार अहवाल येणे बाकी आहे. तर वैराग येथील आलेल्या दोन पैकी दोन्ही अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. वैराग येथील आलेले पॉझिटिव्ह पैकी एक रुग्ण हा नवीन चाटे गल्ली येथील असून दुसरा रुग्ण संतनाथ दिल्ली येथील आहे.









