तरुण भारत संवाद सोलापूर / प्रतिनिधी
एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीतील गवळी वस्ती जवळील बाबुराव नगर येथील कुंटणखान्यावर छापा टाकून पोलिसांनी दोन पीडित महिलांची सुटका केली. या प्रकरणी दोन महिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शबाना सत्तार शेख (वय ४६, रा. कुमठा नाका, हुडको कॉलनी अहिल्याबाई होळकर शाळेजवळ) आणि हिनाकौसार मौलाली शेख (२६, रा. गवळी वस्ती, बाबुराव नगर) अशी या दोन महिलांची नावे आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, गवळी वस्ती जवळील बाबुराव नगर येथे कुंटणखाना सुरु असल्याची माहिती शहर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाला मिळाली. या माहितीवरून पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून या माहितीची खात्री करून घेतली. त्यानंतर या कुंटणखान्यावर छापा टाकून शबाना सत्तार शेख आणि हिनाकौसार मौलाली शेख या दोन महिलांना पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक पक्षाचे पोलीस निरीक्षक बजरंग साळुंखे, प्रशांत क्षिरसागर, राजेंद्र बंडगर, सुवर्णा काळे, महादेव बंडगर, गवळी, इनामदार आदींनी केली.
Previous Articleसोलापूर : सराईत गुन्हेगार बसण्णा शिंदे स्थानबध्द
Next Article हिमाचल प्रदेश : लस घेऊन देखील तीन डॉक्टर पॉझिटिव्ह









