प्रतिनिधी / बार्शी
रेशनचा काळाबाजार उघड झाल्याने आणि त्या संदर्भात पनवेल, बार्शी, वैराग पोलिसांमध्ये गुन्हे दाखल झाले आहेत. संबंधित धान्य बार्शी बाजार समिती येथील व्यापाऱ्यांचे आहे. असे चौकशीत निष्पन्न झाल्याने अनेक व्यापारी यांच्या दुकान आणि गोडाऊनवरती धाड टाकण्याचे काम पोलिसांनी केले आहे. बार्शी बाजार समितीमधील अनेक व्यापाऱ्यांच्या गोडाऊन वरती आणि दुकानावरती धाडी टाकल्याने व्यापारी वर्गाने नाराज होऊन आणि बार्शी पोलिसांत वरती दबाव टाकण्याच्या हेतूने बार्शी बाजार समिती बेमुदत संपाचा इशारा दिला होता आणि दिनांक 12 ऑगस्टपासून बार्शी बाजार समिती बंद ठेवली आहे. आता प्रहार अपंग करांती संघटनेने पोलिसांवर संपच्या माध्यमातून दबाव टाकणाऱ्या बाजार समितीमधील व्यापार्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करा अशी मागणी करणारे निवेदन बार्शीचे तहसीलदार व बार्शी पोलीस यांना दिले आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, बार्शी तालुक्यातून धान्याचा काळाबाजार बाबत रोज गुन्हे दाखल होत असून अनेक व्यापाऱ्यांच्या गोडाऊन वर धाडी टाकण्याचे काम सध्या चालू आहे. यासर्व धाडीमध्ये हजारो टन धान्य आतापर्यंत पोलिसांनी जप्त केले आहे. मात्र पोलीस विनाकारण धाड टाकून त्रास देत आहेत. असा आरोप करून बार्शी मार्केट कमिटीच्या व्यापाऱ्यांनी बेमुदत संप पुकारला आहे. आता या संपाला वादाची किनार लागली असून प्रहार अपंग क्रांती संघटनेने संप पुकारणाऱ्या व्यापाऱ्यांवर ती तात्काळ फौजदारी गुन्हे दाखल करा अशी मागणी केली आहे. ही मागणी करण्याबरोबरच त्यांनी दिलेल्या निवेदनामध्ये नमूद केले आहे की हा संप कोणतीही पूर्वसूचना न देता पुकारल्याने हा संप बेकायदेशीर आहे. आणि या संपामुळे गोरगरीब शेतकऱ्यांचे खूप मोठे आर्थिक नुकसान होणार आहे. प्रहार संघटनेने निवेदनात आरोप केला आहे. की हा व्यापाऱ्यांचा संप म्हणजे रेशन धान्य काळाबाजार करणाऱ्या व्यापाऱ्यांना एक प्रकारे साथ देणे किंवा त्यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळे या संपाचा विपरीत परिणाम होऊन पोलिसांवरती एक प्रकारचा दबाव वाढण्याची शक्यता प्रहार अपंग क्रांती आंदोलन या संघटनेने केली आहे.
Previous Articleस्वराज्य चळवळीचा प्रारंभ म्हणजेच जिजाऊ आऊसाहेब : मृणाल कुलकर्णी
Next Article सातारा जिल्ह्यात आज 208 नागरिकांना दिला डिस्चार्ज








