प्रतिनिधी / बार्शी
महाराष्ट्रासह बार्शी शहर व तालुक्यातील सर्वधर्मीय प्रार्थना स्थळे मंदिरे, मस्जिद, चर्च, गुरूद्वारा भाविक भक्तांसाठी सुरू करून दर्शनासाठी खुले करावेत या मागणीकरीता, महाराष्ट्रातील आघाडी सरकारला जागे करण्यासाठी भारतीय जनता पार्टी बार्शी शहर व तालुक्याच्या वतीने आमदार राजेंद्र राऊत यांच्या नेतृत्वाखाली व माजी नगराध्यक्ष विश्वासभाऊ बारबोले, नगराध्यक्ष ॲड. आसिफभाई तांबोळी, पंचायत समिती सभापती अनिल काका डिसले, माजी नगराध्यक्ष रमेश पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत बार्शीतील श्री भगवंत मंदिराच्या समोर वारकरी संप्रदायातील भाविक भक्तगण बंधू-भगिंनीसोबत टाळ-मृदुंगाच्या गजरात घंटानाद आंदोलन करण्यात आले.
यावेळी बोलताना आमदार राजेंद्र राऊत म्हणाले की, कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर गेली 5 महिन्यांपासून सर्वधर्मीय प्रार्थनास्थळे मंदीरे, मस्जिद, चर्च, गुरूद्वारा हे बंद आहेत. देशातील लॉकडाऊनच्या अनलॉक प्रकीयेनंतर इतर राज्यात नियम व अटींसह सर्वधर्मीय प्रार्थना स्थळे उघडण्यात येवून ती भाविक भक्तांसाठी खुली करण्यात आली आहेत. परंतु महाराष्ट्रातील आघाडी सरकारने सर्व धर्मीय प्रार्थनास्थळे अद्यापही बंद ठेवलेली आहेत. आघाडी सरकारने राज्यात दारू दुकाने, वाईन शॉप सुरू केली, परंतु प्रार्थना स्थळे सुरू केली नाहीत.
आघाडी सरकारने भाविक भक्तांच्या भावनेचा, भक्तीचा व श्रध्देचा विचार करून ती सुरू करावीत या मागणीसाठी आम्हीं भारतीय जनता पार्टीच्या वतीने विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्रजी फडणवीस साहेब, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व भाजपा जिल्हाध्यक्ष श्रीकांत दादा देशमुख यांच्या सोबत हे घंटानाद आंदोलन करीत आहेत. यावेळी माजी नगराध्यक्ष विश्वासभाऊ बारबोले, नगराध्यक्ष ॲड. आसिफभाई तांबोळी यांनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी जि.प.सदस्य व भाजपा तालुका अध्यक्ष मदन दराडे आदी उपस्थित होते.
Previous Articleबार्शीत रक्ताचा तुटवडा, पांगरी पोलीस धावले मदतीला, रक्तदान करून घट्ट केले समाजाशी नाते
Next Article सोलापूर : दार उघड उद्धवा दार उघड









