तरुण भारत संवाद प्रतिनिधी / उस्मानाबाद
कोरोना संकटकाळात पत्रकारांनी प्रशासनाच्या बरोबरीने काम केले आहे. अफवांचे पेव फुटत असताना खऱ्या बातम्या जनतेपर्यंत पोहचवण्यासाठी पुढाकार घेतला आहे यात काही पत्रकार आणि त्यांच्या कुटुंबीयांना कोरोनाची लागण देखील झाली त्यात दुर्दैवी काही जणांचा मृत्यू देखील झाला. तरीदेखील न खचता पत्रकारांनी आपली जबाबदारी नेटाने धरली असून पत्रकार व त्यांच्या कुटुंबियांना पहिल्या टप्यात कोरोनाची लस देण्याबाबत महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा उस्मानाबादच्या वतीने जिल्हाधिकारी उस्मानाबाद यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे अध्यक्ष धनंजय पाटील, सचिव बिभीषण लोकरे, विभागीय मराठवाडा सहसंघटक आकाश नरोटे , उपाध्यक्ष प्रशांत कावरे, कार्याध्यक्ष श्रीराम क्षिरसागर, जिल्हा संघटक सय्यद मुसा, सहसंघटक रामेश्वर डोंगरे, सहसचिव मिलिंद कुलकर्णी, मार्गदर्शक कालिदास म्हेत्रे, सदस्य हरिश्चंद्र धावारे, संतोष कोरडे, सुरेश चव्हाण आदींची उपस्थिती होती.









