नियम अटींचे पालन करणे बंधनकारक
आयुक्त पी. शिवशंकर यांच्याकडून आदेश जारी
तरूण भारत संवाद प्रतिनिधी / सोलापूर
प्रतिबंधीत क्षेत्र वगळता शहर हद्दीतील व्यायाम शाळा 26 ऑक्टोबर पासुन सुरु करण्याचे आदेश मनपा आयुक्त पी. शिवशंकर यांनी दिले आहेत. तसा आदेश सोमवारी जारी करण्यात आला. परंतू कोविड-19 च्या नियमांचे पालन करने बंधनकारक आहे. अन्यथा कारवाई करण्यात येणार असल्याचे आदेशामध्ये म्हटले आहे.
शहरातील व्यायाम शाळा सुरु केल्या असल्या तरी प्रतिबंधीत क्षेत्रातील व्यायाम शाळा मात्र बंदच राहणार आहेत. तसेच ज्या व्यायाम शाळा सुरु राहतील, त्यांनी मास्क वापरणे, वेळोवेळी सॅनिटायझर वापरणे, सुरक्षित अंतर पाळणे आदी नियमांचे पालन करने बंधनकारक असणार आहे. यातील आदेशाचे व नियमांचे उल्लंघन करणारी व्यक्तीवर आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 चे कलम 51 ते 60, तसेच भारतीय दंड संहितेचे कलम १८८ नुसार अन्य कायदेशिर तरतुदीनुसार कार्यवाही करण्यात येणार आहे.