चोरीच्या गुन्ह्यात मदत करण्यासाठी साडेसात लाखाची घेतली होती लाच
प्रतिनिधी / सोलापूर
साडेसात लाख रुपयांची लाच स्विकारल्या प्रकरणी सलगरवस्ती पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक संपत नारायण पवार व सहाय्यक पोलीस निरीक्षक रोहन पंढरीनाथ खंडागळे या दोघा अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले. पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी निलंबणाचे आदेश दिले. मुरूम चोरीच्या गुन्ह्यात मदत करण्यासाठी पोलीस निरीक्षक पवार व सपोनि खंडागळे यांनी ही लाच घेतली होती.
याबाबत अधिक माहिती अशी की, तक्रारदार विरुद्ध सलगरवस्ती पोलिस ठाण्यामध्ये मुरूम चोरीचा गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्यामध्ये त्यास अटक न करण्यासाठी तसेच जप्त करण्यासाठी नेलेली वाहने सोडण्यासाठी पोलीस निरीक्षक पवार व सहाय्यक पोलीस निरीक्षक खंडागळे या दोघांनी दहा लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. तडजोड अंती साडेसात लाख रुपये स्वीकारत असताना खंडागळे यास लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने रंगेहाथ पकडले. त्यानंतर पोलिसांनी पोलीस निरीक्षक पवार यांनाही ताब्यात घेतले. या प्रकरणी दोघांवर फौजदार चावडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याची गंभीर दखलघेत पोलीस आयुक्त शिंदे यांनी दोघांना पोलीस सेवेतून निलंबित करण्यात आल्याचे आदेश दिले.
दरम्यान सदर बाजार पोलिस ठाण्याच्या दुय्यम पोलीस निरीक्षक अश्विनी भोसले यांची सलगरवस्ती पोलीस ठाण्याचा पदभार देण्यात आलेला आहे. तर नियंत्रण कक्षातील पोलीस निरीक्षक चंद्रकांत वाबळे यांची नियुक्ती सदर बाजार पोलिस ठाण्यात करण्यात आल्याचे आदेश पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी दिले.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









