तरुण भारत संवाद प्रतिनिधी/करमाळा
सोलापूरच्या पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी करमाळा तालुक्यातील वाळू माफियावर धाड टाकली. चिखलठाण येथे टाकलेल्या छाप्यात तीन मालट्रक, वाळू उपसणारी बोट व लाखो रुपयाची वाळू जप्त करण्यात आली. पोलीस अधीक्षक सातपुते यांनी करमाळा पोलिसांना अंधारात ठेवून सोलापूरच्या पोलिसांच्या टीम कडून हा छापा टाकल्यामुळे वाळूमाफिया रंगेहात पकडले. यामुळे आता या प्रकरणात हप्ता वसूल करणारे अधिकारी पकडले जाणार काय असा प्रश्न उपस्थित होत आहे.
करमाळा पोलिसांच्या आशीर्वादाने तालुक्यात मोठ्या प्रमाणावर अवैधरित्या वाळू व्यवसाय चालतो अशा तक्रारी सातपुते यांच्याकडे गेल्या होत्या. करमाळा दौऱ्यावर आल्यानंतर त्यांनी अवैद्य धंद्याचा बिमोड करण्याची घोषणा करून अवैध धंद्यांची संबंध ठेवणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा दिला होता.
चिखलठाण येथून रोज रात्री अवैधरित्या वाळू उपसा होतो अशी माहिती गुप्त यंत्रणेमार्फत पोलीस अधीक्षक सातपुते यांना मिळाली. या माहितीवरून त्यांनी फिल्मी स्टाईल प्रमाणे सोलापूरचे पोलीस पथक रातोरात घटनास्थळी पाठवून वाळू माफियांना रंगेहात पकडले. यातील दोन ट्रक वाळू सह करमाळा पोलिस ठाण्यात आणून जप्त करण्यात आले आहेत. या वाळू माफियांकडून आता हप्ता गोळा करणाऱ्या कर्मचाऱ्यांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांचा तेजस्वी प्रहार वाळू माफियांना महागात पडला असून सर्वसामान्यत मात्र आनंदाचे वातावरण निर्माण झाल्याचे चित्र दिसून येत आहे .करमाळ्यातील चक्री जुगार आज पूर्णपणे बंद करण्यात आला मटका मात्र जोरात सुरू असून गांजा, भांग, हातभट्टी; गुटका असे अवैध धंदे करणाऱ्या मध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









