तरुण भारत संवाद प्रतिनिधी/सोलापूर
ग्रामीण पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्या वाहनावर अज्ञाताने दगड भिरकावला. जुना पुना नाका परिसरातील हॉटेल ॲम्बेसिडर समोरील रस्त्यावर हा प्रकार घडला. याप्रकरणी अज्ञाता विरुद्ध फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना गुरुवारी (दि.11) सायंकाळच्या सुमारास घडली.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, पोलीस अधीक्षक सातपुते शासकीय कामानिमित्त पुण्याकडे निघाल्या होत्या. छत्रपती शिवाजी चौकातून जुना पुना नाका या रस्त्याने त्यांचे वाहन जात होते. त्यावेळी अचानक वाहनाच्या पाठीमागील काचेवर अज्ञाताने दगड भिरकावला. यामुळे काचेला तडे गेले.
या घटनेनंतर पोलीस अधीक्षक सातपुते या दुसऱ्या वाहनातून पुण्याकडे रवाना झाले आहेत. या घटनेची माहिती मिळताच फौजदार चावडी पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. दगड भिरकावणाऱ्या अज्ञाताचा शोध फौजदार चावडी पोलिसांकडून घेण्यात येत आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येत आहेत. दरम्यान पोलिसांनी एका संशयिताला चौकशीकरिता ताब्यात घेतले असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या गुन्ह्याचा तपास फौजदर चावडी पोलीस ठाण्याचे पोलीस करीत आहेत.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









