तरुण भारत संवाद प्रतिनिधी / करमाळा
करमाळा येथे पतीच्या खून प्रकरणी पत्नीस जामीन मंजूर झाला आहे. गेल्या वर्षी १२ ऑगस्ट २०२० ला अनिल मोरे यांचा करमाळा जामखेड रोड वर मृतदेह आढळून आला होता. हा खून अभिजीत उर्फ अंकित जगन्नाथ बुचडे याने व मयत अनिल मोरे यांची पत्नी संगीता अनिल मोरे यांनी कट करून केलेला असल्याचे निष्पन्न झाले होते.
याबाबत हकीकत अशी की, गेल्या वर्षी १२ ऑगस्ट २०२० ला सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास करमाळा जामखेड रोड वरील हॉटेल हिंदवी समोर असणारे डांबरी रोडच्या कडेला खड्ड्यामध्ये एक इसम अंदाजे ३५ ते ४० वर्षे वयाचा मयत अवस्थेत आढळून आली असल्याची माहिती हॉटेल मालक गजानन यादव यांनी करमाळा पोलीस स्टेशन येथे दिलेली होती. तपासादरम्यान साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यात आले व घटनेचे प्रत्यक्ष साक्षीदार यांच्या जबाबावरून सदरील इसम हा अनिल मोरे (रा. मु.पो जामगाव, तालुका आष्टी, जिल्हा बीड) येथील रहिवासी असून त्याचा खून अभिजीत उर्फ अंकित जगन्नाथ बुचडे याने व मयत अनिल मोरे यांची पत्नी संगीता अनिल मोरे यांनी कट करून केलेला असल्याचे निष्पन्न झाले.
यानंतर अभिजीत बुचडे व संगीता मोरे या दोघांना १६ ऑगस्ट २०२० रोजी अटक करण्यात आली होती. यातील आरोपी गीता मोरे हिने जिल्हा व सत्र न्यायालय बार्शी येथे जामीन मिळणे कामी अर्ज दाखल केला होता. सदर अर्जाची सुनावणी अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश आर एस पाटील यांच्यासमोर झाली. यानंतर आरोपी संगीता अनिल मोरे हिची जामिनावर मुक्तता करण्यात आली. यात आरोपी नंबर दोन मयत अनिल मोरे यांची पत्नी संगीता मोरे तिच्या वतीने ॲड निखिल पाटील, ॲड विक्रम सातव, ॲड दत्तप्रसाद मंजरतकर, यांनी काम पाहिले. तर सरकार पक्षाच्यावतीने ॲड पी ए बोचरे यांनी काम पाहिले.
Previous Articleकाळय़ा यादीतील गुन्हेगारांना तंबी
Next Article जळगावात भीषण अपघातात 15 मजूर जागीच ठार









